मित्रानो आपण बाजारातून दरवर्षी बी बियाणे खरेदी करतो पण आपण कधी बियाणाला लावलेल्या लेबल चा विचार केला का की हे लेबल आपल्याला काय दर्शवते .
चला तर मंग आज आपण याचं गोष्टीची माहिती घेऊया.
कुठल्याही कंपनीला बीज प्रमाणीकरण केलेल्या बियाच्या पिशव्या भरून त्यास मोहोर लावण्याच्या वेळी बीज प्रमाणीकरण यंत्रणेकडून उत्पादकला पिशवीला लावण्यासाठी लेबल दिले जातात.
लेबल चा रंग -:
१) निळा
२ ) पांढरा
३ ) पिवळा हे रंग लेबल ला वापरल्या जातात .आकार -:
लेबल चा आकार हा १५ × ७.५० सेमी इतका असते.
लेबल वर पिक ,वानाचे नाव ,बियाणाचा वर्ग , लॉट क्रमांक उत्पादकाचे नाव , दिनांक , शुद्ध बियाणे आणी इतर घटकाची टक्केवारी उगवनशक्ती , बियाणेचाचणी बियाणे वापरण्याची शेवटची तारीख असा सर्व तपशील त्या लेबल वर नोंद केलेला असतो . लेबल वर दिलेली सर्व माहिती ही बीज प्रमाणीकरण यंत्रणेने बियाची खरेदी केलेल्या ग्राहकास दिलेली एक हमी असते . या बियाणाची विक्री परवानाधारक विक्रेते , कृषीसेवा केंद्र , शेतकरी गट यांच्या मार्फत होत असते .
शेतकऱ्याने बियाणे विकत घेताना bag ला लावलेले लेबल व त्यावरील वानाची जात ,वापरण्याची तारीख , पिशवीची शिवण ,लेबल मोहोर या सर्व गोष्टी व्येवस्तिथ पाहून घेणे गरजेचे असते. तसेच बियाण्यांची खरेदी बिल घेणे गरजेचे असते .
बियाणे शेतात पेरताना किंवा लागवड करताना पिशवीच्या वरचे तोंड ,लेबल ,मोहोर तसेच ठेऊन खालच्या बाजून फोडून बियाणं वापरावे , पुढे काही बियाणामध्ये खराबी असल्यास आपल्याला त्या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करण्यास पुरावा म्हणून लावावा लागतो .
बियाण्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना उत्पादन खर्चात पायाभूत बियाणे किंमत ,मशागत ,पाणी, पिकसवरक्षण , विलगीकरण ,नरवंध्यत्व ,परागसिंचन ,अशा अनेक गोष्टीचा खर्च धरावा लागते .कोणत्याही कारणाने जर प्लॉट वाया गेला तर उत्पादनात घट येते त्यामुळे सर्व गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते .
बियाण्या संदर्भात कायदेशीर तरतूद -:
भारतीय बियाणे कायदा १९६६ पास झाला होता पण बियाणे संदर्भात कायदा हा १९६९ मध्ये अमलात आला आहे .
हे कायदा नोंदणिक्रत जातीच्या बियाण्यासाठी लागू आहे .
१ ) केंद्रीय बियाणे समिती -:
ही समिती भारत सरकारला बियाणे नोंदणी करणे , बियाणाची गुणवत्त निश्चित करणे ,बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा , बियाणे चाचणी पद्धती व प्रयोगशाळा या गोष्टीवर सल्ला देते .
२ ) केंद्रीय बियाणे प्रमाणीकरण मंडळ -:
वेगवेगळ्या राज्यातील बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेत सुसूत्रता करणे हे या मंडळाचे काम आहे .
३ ) राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा -:
या यंत्रणेकडे नोंदणिक्रत बियाण्याच्या प्राणीकरण करणे ,प्रमाणीकरणाच्या पद्धती निर्माण करणे ,राज्यातील रोपपैदासकाराची नोंद ठेवणे हे काम ह्या मंडळ चे आहे .
४ ) केंद्रीय बियाणे प्रयोग शाळा -:
राज्यातील बियाणे परीक्षण प्रयोगशाळेच्या कामात सुसूत्रता ठेवणे व बियाणे चाचणीत एकसारखेपणा ठेवणे हे या मंडळाचे काम आहे .
५ ) राज्य बियाणे परीक्षण प्रयोगशाळा -:
राज्यात तयार होणाऱ्या प्रामाणित बियाण्याचे परीक्षण करणे हे या मंडळाचे काम आहे .
या कायद्याप्रमाणे उत्पादन व प्रमाणीकरण यात निर्माण झालेल्या वादात आपिलाची तरतूद आहे .
मित्रांनो तुम्हाला Agriculture group वरील पोस्ट आवडली असल्यास कृपया like, shere, comment, करा.
मित्रानो अशाचं नवनवीन पोस्ट आपण वाचकासाठी लेखन करतोय कृपया like, shere, आणि comment करायला विसरू नका.





