रोगाचा अंदाज -: रोगजंतू आणि वातावरण या गोष्टीच्या सखोल माहितीच्या आधारे रोगनियंत्रण करणे हे खूप कमी खर्चात होऊ शकतो. काही रोगाच्या बाबतीत नियन्त्रन करणे रोगाच्या पादुर्भावच्या नजीकच्या काळात वाढण्याच्या तसेच पादुर्भाव केव्हा आणी कोठे होता या सर्व बाबी ची पूर्ण माहिती असल्याशिवाय अशा रोगांना नियंत्रण करणे अवघड असते.
१ ) बटाटा चा करपा रोग -:
‘ फायटोप्थोरा इन्फेस्टन्स ‘ या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि कालांतराने रोगात रूपांतर होण्यासाठी दोन ते तीन दिवस १० ° सेल्सियस किंवा त्या पेक्षा जास्त तापमान आणि ७५ ℅ पेक्षा जास्त आदर्ता या दोन बाबी पिकाच्या वाढीसाठी वारवार येने आवश्यक असतात.
२ ) भाताचा तांबडा टिपका -:
” हेल्मिथोस्पोरियम ओरायझी “या बुरशीमुळे होणारा रोग साठीच्या स्वरूपात यण्यासाठी पिकाच्या वाढीच्या कालावधीत जास्त पाऊस आणि कमी निचऱ्याची जमीन असेल तर हा प्रकार होऊ शकतो..
भाताचा करपा रोग -:” पायरीक्यूलारिया ओरायझी “ या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाची साथ येण्यासाठी २५ ते २८ ° इतके तापमान व ७५ ते ८५ ℅ आदर्ता कमी प्रमाणात वारं आणि ढगाळ वातावरण या गोष्टीमुळे हा रोग येऊ शकतो.
वाटाण्याचा भुरी रोग -:
” इरिसायफी पॉलिग्वानि “या बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव आणि साथ येण्यासाठी कोरडे वातावरण २० ते २५ ° अंश सेल्सियस तापमान आणी ४० ते ५० ℅ वातावरणातील आदर्ता असल्यास हा रोग येण्याची जास्त प्रमाणात शक्यता असते .गव्हाचा तांबेरा रोग -:PAKSHINIYA GRAMINIS TRITISAYया बुरशीमुळे होणाऱ्या तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव व वाढ होण्यासाठी वातावरणातील तापमान २० ते २५ ° अंश सेल्सियस व आदर्ता ५० ते ७० ℅ आणि गव्हावर जास्त प्रमाणात दव असल्यास हा रोग येऊ शकतो .
द्राक्षाचा केवडा रोग -:
” प्लाझमो व्हेक्टिकोला “या बुरशीमुळ होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव वेलीवरिल रोगट पानामध्ये सुप्त् डोळ्यामध्ये असलेल्या लेंगिक बिजामार्फत ज्या वेळी अनुकूल वातावरण निर्माण होते त्या वेळी सुप्त बिजापासून असंख्य आलेंगिक बीजे निर्माण होतात ते बीज निर्माण होण्यास १२ ते १३ ° अंश सेल्सियस तापमान असणे आवशक असते. तसेच पंधरा दिवसाच्या फरकाने पाऊस अधूनमधून पडत राहिल्यास हा रोग झपाट्याने पसरतो
मित्रांनो तुम्हाला Agriculture group वरील पोस्ट आवडली असल्यास कृपया like, shere, comment, करा
मित्रानो अशाचं नवनवीन पोस्ट आपण वाचकासाठी लेखन करतोय कृपया like, shere, आणि comment करायला विसरू नका
I am farmer I like farming, so I know that the way of the disease is made from the farm disease or it is very happy to get what you want to be on the way of crop
View more posts