मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का पिकावरील कोणकोणते किड नुकसानीचे असतात अन कोणते किड उपयुक्त असतात

पिकावरील नुकसानकारक कीड -:

मित्रानो तुम्हाला हे माहिती आहे का की प्रत्येक पिकाला व पिकावर दोन कीड असतात एक उपयुक्त अन दुसरे नुकसानकारक आपण आज या लेखात हेच पाहणार आहेत की पिकावरील नुकसानकारक किड्याची माहिती

मित्रानो विविध प्रकरचे कीड हे पिकाला घातक असतात तसेच सर्वच कीड पिकावर सगळ्या ठिकाणी येतात असे पण नाही. पण काही ठराविक कीड असे आहेत जे भारतात सगळ्याच ठिकाणी आढळतात भारतात 1960 ला टोळधाड ही कीड आली होती त्या कीड ने शेतकऱ्याचे भरपूर नुकसान केले टोळधाड या किड्याला आपण आंतराष्ट्रीय म्हणू कारण ही की या देशातून त्या देशात जाते  , असे बऱ्याच प्रकारचे कीड आहे जे पिकाला हानिकार आहेत (उदा..)  टोळधाड ,घाटेआळी , कोळी

१ ) -: टोळधाड -: टोळधाड ही आर्थॉप्टरा या श्रेणीतील कीड आहे तसेच ,तसेच ही कीड मोट्या संख्येने एका देशातून दुसऱ्या देशात जाते . ही कीड पिकाचे खूप मोट्या प्रमाणात नुकसान करते विशेष ताबूस रंगाच्या टोळधाड ह्या खूप खावड असतात एका टोळधाडीत लाखो टोळधाड असतात त्यामुळे पिकाचे खूप जास्त प्रमाणात आणी कमी कालावधीत पिकाचे ही कीड नुकसान करतात. टोळधाड ही पाकिस्तान मधून राजस्थानच्या वाळवंटी भागात शिरतात आण त्या ठिकाणी त्यांची जास्त प्रमाणात उत्पती होते . तसेच त्याचे नंतर थवे होउन ते थवे राजस्थान ,पंजाब , उत्तर प्रदेश ,गुजरात या ठिकाणी जास्त पसरतात महाराष्ट्रात 1960 सली येऊन गेली परंतु त्या नंतर आजपर्यंत महाराष्ट्रात टोळधाड आली नाही

२) -: घाटेआळी -: यामध्ये या किडीचा प्रकार 1990 -1991 पासून जास्त प्रमाणात दिसून येतोय 1993 व 1998 साली कापूस ,तूर, हरभरा ,इतर पिकावर या आळी चा मोट्या प्रमाणात प्रधुर्भाव होऊन पिकाचे अतोनात नुकसान देखील झाले. दरवर्षी या किडी मुळे हरभरा आणी तूर या पिकाचा जवळजवळ 300 कोटी रुपयांचे नुकसान भारतात होते .

पिकावरील उपयुक्त कीड -:

मधमाशी  -: मधमाशी ही हायमेनॉप्टेरा या श्रेणीतील कीड आहे या मधून शेतकऱ्याला मध व मेन हे पदार्थ मिळतात . माध्यमाशा आणि फुले येणाऱ्या पिकाचा खूप संबंध असते. आपण यांचा जीवनक्रम पाहूया

जीवनक्रम -: माध्यमाशाच्या तिन जाती असतात त्याती 1) मोठी मधमाशी ( एपिस डॉरसेटा ) 2) भारतीय मधमाशी ( एपिस सरांना इंडिका ) 3) छोटी मधमाशी ( एपिस फ्लोरिया )

१) -: मोठी मधमाशी ही साधारण रहदारी पासून उंच जागेवर असतात तिथेच आपली पोळी तयार करतात ही माशी आक्रमक असते. त्यामुळे ह्या माशाचे पालन करणे अवघड जाते

२) -: भारतीय मधमाशी ही आकारने लहान असून याची पोळी लहान आकाराची असते. तसेच या एका ठिकाणी 7 ते 8 पोळी तयार करू शकतात .या माशा आक्रमक नसतात

३) -: छोटी मधमाशी ही आकारने लहान असतात व पोळी देखील लहान आकाराची करतात तसेच ही मधमाशी पालन करण्यासाठी योग्य असते आणी याचे पोळ्यामधून वर्षभरात 10 ते 15 किलो मध मिळू शकतो .

Sd द्वारा प्रकाशित

I am farmer I like farming, so I know that the way of the disease is made from the farm disease or it is very happy to get what you want to be on the way of crop

3 विचार “मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे का पिकावरील कोणकोणते किड नुकसानीचे असतात अन कोणते किड उपयुक्त असतात&rdquo पर;

Leave a reply to PSSVD जवाब रद्द करें

Design a site like this with WordPress.com
प्रारंभ करें